आपल खान्देशगुन्हेगारी

चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाणात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या!

सासरची मंडळींनी वैशाली तुला मुलगा होत नाही! माझ्या मुलाचे तुच्यासोबत लग्न करून आम्हाला मनःस्ताप झाला आहे, असा तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते, त्यामुळे सततच्या जाचाला कंटाळलेल्या विवाहितेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले.

चाळीसगाव – तालुक्यातील तमगव्हाण येथे 40 वर्षीय विवाहितने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली (उज्ज्वला) राजेंद्र गायकवाड (रा. तमगव्हाण, चाळीसगाव), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मयत विवाहितेचा माहेरील मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी सासरच्या पाच जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचा 2004 मध्ये विवाह राजेंद्र प्रताप गायकवाड यांच्या सोबत झाला. त्यानंतर एक ते दोन वर्ष सासरच्या मंडळींनी चांगले वागवले. सासरची मंडळींनी वैशाली तुला मुलगा होत नाही! माझ्या मुलाचे तुच्यासोबत लग्न करून आम्हाला मनःस्ताप झाला आहे, असा तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते, त्यामुळे सततच्या जाचाला कंटाळलेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असे मयत वैशालीचे वडील योगीराज नामदेव देसले रा. पिंपंळगाव (थळीचे) ता. भडगाव यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी मयत वैशालीचा नवरा राजेंद्र प्रताप गायकवाड, सासरा प्रताप गोपाळ गायकवाड , संगीता काळे, दिनकर प्रताप गायकवाड, केशव गोपाळ गायकवाड यांच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे