आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने १०० टक्के गुण मिळवून पटकावला प्रथम क्रमांक!!

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर एस. एस. सी. परिक्षेत १०० टक्के गुण मिळवून पटकावला प्रथम क्रमांक

पाचोरा (प्रतिनिधी) गेल्या तीन महिन्यांपुर्वी वडिलांचे अकाली निधन झाल्याचे दुःख पेलवत पल्लवी हिने एस. एस. सी. परिक्षेत घवघवती यश संपादन केले. १०० टक्के गुण मिळवुन पल्लवी हिने पाचोरा तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमधील शिक्षक शशिकांत ताराचंद लासुरकर यांचे गेल्या तीन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दु:ख पल्लवी हिस न पेलवणारे असतांनाच तिने या दु:खद परिस्थितीचा सामना करत एस. एस‌. सी. परिक्षेत घवघवती यश संपादन केले. पल्लवी शशिकांत लासुरकर ही येथील बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलमधुन शिक्षण घेत नाशिक बोर्डाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून पाचोरा तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पल्लवी हिला बुऱ्हानी शाळेच्या मॅनेजिंग कमिटी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. ती श्रीमती संगीता शशिकांत लासुरकर व गो. से. हायस्कूल येथील शिक्षक कै. शशिकांत ताराचंद लासूरकर यांची कन्या व सेवा निवृत्त जिल्हा परिषद मुख्याध्यापक ताराचंद अर्जुन लासूरकर यांची नात आहे. पल्लवी हिचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे