ब्रेकिंग

प्रहार शेतकरी संघटना सोमवारी अन्नत्याग आंदोलन करणार , बोलठाण घाटमाथ्यावरील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित!


नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे प्रहार शेतकरी संघटनेकडुन पाच दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून संबंधित प्रशासनाने अजूनही अपेक्षित कार्यवाहीला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आता प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

 नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे तात्काळ सुरू व्हावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटने कडून दिनांक 16 जानेवारी 2023 सोमवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली होती. समस्त काटमाथा परिसरातील नागरिकांनी प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी गुरुवारी कडकडीत बंद पाळला होता. ठिय्या आंदोलनास पाच दिवस झाले तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते कामाबाबत अपेक्षित कार्यवाही नसल्याचे आंदोलन करण्याकडून सांगितले जात आहे. या रस्त्यांच्या न्याय मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल लवकर न घेतल्यास ठिय्या आंदोलनाच्या स्वरूपात बदल करून थेट अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे आंदोलन करते नांदगाव प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे