नाशिक जिल्ह्यासह शहरात विजांच्या गडगडटासह जोरदार पावसाने बॅटिंग केली. मात्र सुसाटेचा वारा व पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.दुपारी ४ वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये विजांच्या गडगडटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
नाशिक शहरातील काही भागात तर ढग फूटी झाल्यासारखं वाटत आहे. गोदावरीचे पाणी वाढले असून जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे.
ऑक्टोंबर हिटचा अनुभव येत असतांना दुपारी अचानक आभाळ भरून आले आणि जोरदार पाऊस सुरु झाला.
दुपारी ४ वाजता वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार झाले. विजांचा कडकडाट सुरु झाला. शहरावर दुपारी ढग दाटून आले आणि काळोख झाला.
त्यानंतर पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. आरटीओ, जत्रा हॉटेल, इंदिरानगर, देवळालीगाव, कॉलेज रोड, पंचवटी, नाशिकरोड, सिडको परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा