आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
डोंगरी व दुर्गम भागातील गोरगरीब धनगर समाजातील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप
कोरोना महामारीत सुद्धा शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या डोंगरी व दुर्गम भागातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणार:
मा.प्रविण काकडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ नवी दिल्ली च्या वतीने डोंगरी व दुर्गम भागातील गोरगरीब धनगर समाजातील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम बुधवार दि. १६|०६|२०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्य़ातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यात राबविण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम आशा पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील कणेरी धनगरवाडा (२० मुले) , शाहूवाडी तालुक्यातील सावरेवाडी धनगरवाडा (१७ मुले) सोनूर्लेपैकी भैरेवाडी धनगरवाडा (३९ मुले) अशा एकुण ७६ मुलाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कोरोना च्या महामारी संकटामुळे डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव अर्थिक संकटात सापडल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे प्रवर्तक मा.प्रविण काकडे यांनी मे २०२० पासून रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातील सर्व तालुक्यामध्ये २२९३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात मदत करून ५९ विद्यार्थी दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी याचा आदर्श या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना घालून दिला आहे.तसेच यावर्षी सुद्धा २५०० विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. येणार आहे हा उपक्रम ७ जिल्ह्यातील धनगरवाडयामधये राबवला जाणार आहे,

याप्रसंगी मा. प्रविण काकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, प्रा शंकरराव पुजारी, जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, प्रा. मंगेश हजारे जिल्हा संपर्कप्रमुख ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, संजय कात्रट कोल्हापूर शहर अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, बापूसाहेब कात्रट शहर संपर्कप्रमुख,प्रकाश झोरे राधानगरी तालुकाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, रामचंद्र कात्रट, प्रथमेश आबोळकर, बाळु अडुळकर, उत्तम शेळके, सदाशिव काळे, बिरु बावदाने, नागेश कात्रट व विद्यार्थी उपस्थित होते.





