आपल खान्देश
डंपरने दुचाकीला उडविले; दोन सख्ये भाऊ ठार !!
भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर डंपरने दुचाकीला उडविल्यामुळे दोन भावांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी मनीष दर्डा (वय ३०) आणि रितेश दर्डा (वय २६) हे दोघे भाऊ जळगाव येथे सीसीटिव्हीचा व्यवसाय करतात. काल रात्री ते महामार्गावरून दुचाकीने जळगावकडून भुसावळला येत होते. साकेगाव ते भुसावळच्या दरम्यान असणार्या ट्रॅक्टर शो-रूमच्या समोर त्यांच्या दुचाकीला जीजे.१२-वाय.८१०६ या क्रमांकाच्या डंपरने उडविले. यात मनीष आणि रितेश या दोन्ही भावांचा मृत्यू झाला.



