आरोग्य व शिक्षणदेश-विदेश

लहान मुलांना मास्कची आवश्यकता नाही; केंद्र सरकारचे निर्देश जारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने आज बालकांना मास्कची आवश्यकता नसल्याचे नवीन गाईडलाईन्समध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये असं या गाईडलाईन्समध्ये सांगितलं आहे. लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार, 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावणं बंधनकारक नाही. तर 6-11 वर्षाच्या मुलांनी आई-वडिलांच्या देखरेखीखाली मास्क लावू शकतात. तसंच 12 वर्षावरील मुलं मास्क वापरु शकतात.

केंद्राच्या नव्या नियमानुसार, मुलांना उपचारादरम्यान स्टिरॉईड न देण्याचा सल्ला दिला आहे. स्टिरॉईट केवळ अत्यावश्यक, गंभीर स्थितीत असलेल्याच मुलांना आवश्यकतेनुसार द्यावे. तसंच योग्य काळासाठीच अशी औषधं दिली जातील याचं भान ठेवावं, असाही सल्ला देण्यात आला आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे