पाचोरा नगरपालिकेने केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा अन्यथा, वंचित बहुजन आघाडी बसणार आमरण उपोषणाला..!
जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा नगरपालिकेने केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा अन्यथा येत्या 25 जानेवारीला वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
पाचोरा नगरपालिकेने महापुरुषांच्या सुशोभीकरणाच्या कामात शासनाचा लाखो रुपयांचा निधीचा भ्रष्टाचार केले असल्याचे निवेदन वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा तर्फे जिल्हाधिकारीनां देण्यात आले आहे या भ्रष्टाचारात सामील असलेले पाचोरा नगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 25 जानेवारी 2023 ला वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल भाऊ बागुल, पाचोरा तालुका महासचिव दीपक परदेशी, पाचोरा तालुका उपाध्यक्ष सुनील कदम, प्रसिद्धी प्रमुख आकाश पवार, शेख मुस्ताक शेख गफूर भाई तसेच महिला आघाडीचे संगीताताई साळुंखे, शबनम जमादार, कल्पनाताई परदेशी, कदम मॅडम व कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, राहुल सुरवाडे, ललित घोडके, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.



