उत्तर प्रदेशमधील लखीमपरमध्ये शेतकऱ्यांना चिरडुन ठार मारल्याच्या घटनेमूळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणुन 11 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला आहे.अत्यावश्यक सेवा सोडुन हा बंद असणार आहे,अशी माहिती देण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे,जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
‘लखीमपुरची घटना अत्यंत गंभीर आहे.एका मंत्र्यांचा मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालुन ठार मारले आहे.यात त्याचा सहभाग दिसुन येत आहे.शेतकऱ्यांना चिरडून मारणं असं कुठेही सरकारनं केलं नाही जे उत्तर प्रदेशात भाजप सरकारनं केलं आहे,असं जयंत पाटील म्हणाले.
‘या घटनेचा निषेध म्हणुन आम्ही 11 ऑक्टोबरला राज्यात बंद पुकारत आहोत.आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली असुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे’,असंही पाटील यांनी सांगितलं.शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असताना हे कृत्य करण्यात आलं आहे.शेतकऱ्यांच्या या आंदोलनात आतापार्यंत 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.भाजपची समाजकंटकाबाबतची ही भुमिका स्पष्ट करणारी आहे.जनरल डायर च आठवण करणार हे कृत्य आहे’अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
क्रुझवर जी काही कारवाई झाली त्यानंतर आरोपींना घेऊन ते जातात,एनसीबी पेक्षा त्यांचा रोल जास्त आहे असं दिसतं आहे.मुंबईतून हे bollywood दुसरीकडे जावं यासाठी हा प्रयत्न आहे.एनसीबी ला माहिती दिली तर ते पकडणार ना.तु कोण पकडणार? केंद्रीय तपास यंत्रणेचा असा दुरुपयोग सध्या चालु आहे असं स्पष्ट मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा