क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

पुन्हा अलिबागचं नाव घ्याल तर खबरदार!’, आदित्य नारायणच्या ‘त्या’ संवादानंतर अमेय खोपकरांकडून कानउघडणी

 

इंडियन आयडोलच्या स्पर्धकाशी बोलताना आदित्य नारायण याने ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते. यावर आता समस्त अलिबागकरांनी आक्षेप घेत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या 

 

सध्या सोनी टीव्हीचा ‘इंडियन आयडॉल 12’ हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे वादात अडकतो आहे. प्रेक्षकांकडूनही या कार्यक्रमावर मोठा आक्षेप घेतला जात आहे. इतर वाद सुरु असतानाच आता या शोचा होस्ट गायक आदित्य नारायण देखील मोठ्या वादात अडकला आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना आदित्य नारायण याने ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते. यावर आता समस्त अलिबागकरांनी आक्षेप घेत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या 

यानंतर आता अमेय खोपकर यांनी देखील आदित्य नारायण याच्या या वक्तव्यावर चांगलीच कान उघडणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आदित्यला आपल्या फेसबुक लाईव्ह सेशनमधून कडक शब्दांत त्याला समज देखील दिली आहे.

काय म्हणाले अमेय खोपकर?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले की, ‘आदित्य नारायण याच्या या वक्तव्याचा निषेध नक्कीच व्हायला पाहिजे. हिंदी वाहिनीवर असं सरळ म्हटलं जात. यांना अलिबागची संस्कृती माहीत नाही, यांना अलिबागची लोकं माहिती नाही. आमचं, या अलिबागकरांचं डोकं फिरलं तर हिंदीतली एक ही गोष्ट अलिबागमध्ये जाऊ देणार नाही.

पुढे ते म्हणाले, ‘हा अलिबागकरांचा अपमान आहे. याचा आम्ही निषेध करतो. आताच माझं उदित नारायण यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना माझ्या भाषेत समजावले आहे. त्यांना हे देखील सांगितले की, हल्ली त्याच्या मुलाच्या आदित्यच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्याचा आगाऊपणा आणि उद्धटपणा वाढल्याच्या आणखी तक्रारी येत आहेत. अलिबागचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही! मी वाहिनीशी देखील संपर्क साधला आहे, त्यांना सांगितले आहे की, पुढच्या भागात त्यांना अलिबागकरांची जाहीर माफी मागावी लागेल.’

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे