आरोग्य व शिक्षण
प्लाझ्मा थेरपी कोविड 19 उपचारातून बाहेर!
प्लाझ्मा थेरपी उपचारातून बाहेर कोव्हिड-19 वरच्या उपचार पद्धतीतून ‘प्लाझ्मा थेरपी’ काढून टाकण्यात आली आहे.ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स , इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च, कोव्हिड-19 नॅशनल टास्कफोर्स आणि आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांपूर्वीच देशभरातील तज्ज्ञ आणि संशोधकांनी ‘प्लाझ्मा थेरपी’ च्या अनियंत्रित वापरावर निर्बंध घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती. ‘प्लाझ्मा थेरपी’ कडे कोव्हिड-19 विरोधात एक उपाय म्हणून पाहिलं जात होतं. पण, ही थेरपी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.





