महाराष्ट्र

नदीत ग्रॅनाईड आढळल्याने सातारा जिल्हा हादरला; दहशतवाद विरोधी पथक दाखल

घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकसह मोठा पोलिस फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे.

कराड पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तांबवे गावानजीक कोयना नदीवर पूल आहे. या पुलानजीक सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही युवक मासेमारी करीत होते.

कराड : कराड तालुक्यातील तांबवे गावानजीक असलेल्या कोयना नदीच्या पुलानजीक ग्रॅनाईड बॉम्ब सापडल्याने जिल्हा हादरला आहे, सोमवारी दुपारी मासेमारी करणार्‍या काही युवकांच्या जाळ्यात हे बॉम्ब सापडले. घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकसह मोठा पोलिस फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे.

कराड पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तांबवे गावानजीक कोयना नदीवर पूल आहे. या पुलानजीक सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही युवक मासेमारी करीत होते. त्यावेळी त्या युवकांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. युवकांनी तातडीने याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. पथकाने प्राथमिक पाहणी केली असता ते ग्रॅनाईड बॉम्ब असल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबतची माहिती दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाकडून ग्रॅनाईडची तपासणी सुरू असून ते नदीपात्रात कोणी टाकले याचा शोध घेतला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे