राजकीय

शिवसेना अशीच वागणार तर राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

शरण खन्ना

वाशी : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, नवी मुंबईत राष्ट्रवादीला विश्वासात न घेता विकासकामांचे श्रेय शिवसेना घेत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना अशीच वागत राहणार तर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही दिला आहे.

वाशी येथील लक्ष्मीनारायण सभागृह, ऐरोली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हा इशारा दिला.

शिवसेना अशाच पद्धतीने काम करत असेल तर ते एक प्रकारे भाजपाला सत्तेची दार खुली करत आहे, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीला मानतसुद्धा नाहीत, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. शिवसेना अशीच वागत राहिली तर आगामी निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा ठाणे जिल्हा जिंकणे सोपे होणार आहे. वेळ राहता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करत आव्हाड यांनी सूचक इशारा दिला आहे.

शिवसेनेत दाखल झालेले नवीन गवते यांनी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष किशोर उर्फ अन्नू आंग्रे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डावपेच खेळला जात आहे. गुन्हे दाखल करायचेच होते, तर गंभीर गुन्हे दाखल करायला हवे होते, असे म्हणत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंग्रे यांना स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी पाठीशी घातले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे