गुन्हेगारीमहाराष्ट्र

जळगाव – चार हजारांची लाच भोवली : पोलीस हवालदारास रंगेहात पकडले

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचा पोलीस कर्मचारी; पाचोरा तालुक्यात खळबळ


पाचोरा (झूम मराठी)भाड्याने दिलेली बैलगाडी तक्रारदाराला मिळवून देण्यासाठी चार हजाराची लाच घेणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारास जळगाव लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही, उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत परत मिळवूनदेण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी ५ हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायीकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक केली. विशेष म्हणजे आरोपी हवालदार हा रजेवर असल्याची माहिती आहे.

सापळा यशस्वी जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे