आपल खान्देश
चाळीसगावात बनावट तंबाखूची विक्री करणारे रॅकेट
चाळीसगाव (जळगाव) : तंबाखूचे उत्पादक व्ही. एच. पटेल अँड कंपनीच्या नावाने हलक्या दर्जाची बनावट तंबाखूची विक्री pकरणारे रॅकेट सक्रिय असल्याचे आढळून आले. सूर्य छाप ब्रॅण्ड नेमने निकृष्ट दर्जाची एक लाख २० हजार रुपयांचा बनावट तंबाखूच्या १२ गोण्या पोलिसांनी जप्त करून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई आज मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील हुडको कॉलनीतील त्रिमूर्ती बेकरीजवळ एका घरात करण्यात आली आहे.
सूर्य छाप ब्रॅण्ड नावाने निकृष्ट दर्जाचे तंबाखू वापरून कंपनीच्या पॅकिंगप्रमाणे हुबेहुबे पद्धतीने लहान पुड्या व त्याचे मोठे पुडे तयार करून कमी किंमतीमध्ये शासनाचा जीएसटी व इतर कर बुडवून अवैध प्रकारे सर्रास विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाला मिळाली होती. याची चौकशी केली असता हा बनावट तंबाखूचा माल पटेल यांच्या कारखान्यात तयार झालेला नसून ब्रॅण्ड नेमने पुडे तयार करून विक्री करण्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सूर्य छाप तंबाखूचे दुसरे उत्पादक एच. एच. पटेल अँड कंपनीतील व्यवस्थापक नविन हरियाणी यांनी पोलीसात तक्रार केली.
तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. ए. सैय्यद, हवालदार दिपक पाटील, निलेश पाटील, अमोल पाटील यांच्या पथकाने हुडको कॉलनीत इरफान मिर्झा याच्या घरात धाड टाकली. त्यावेळी सूर्य छाप तंबाखूच्या पुड्याचा नवीन तयार माल प्लस्टिक गोण्यामध्ये गोण्या शिवताना इरफान अक्रमबेग मिर्झा (वय ३८) व रिजवान शेख नजीर (वय २३, दोन्ही रा.चाळीसगाव) यांना पकडले. सदरचा माल हा निकृष्ट तंबाखू वापरून डुप्लीकेट तयार करण्यात आल्याची पोलीसांची खात्री झाली. कंपनीचे खोटे स्वामित्व चिन्ह वापरून माल मराठवाडा परीसरात वितरीत करून फसवणूक करीत असल्याचे चौकशीत उघडकीस झाले. त्या घरातून एक लाख २० हजार रुपये किंमतीच्या १२ प्लॅस्टिकच्या गोण्या जप्त केला आहे. वरील दोघांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




