Bribe trape : महावितरण वीज कंपनीच्या लाचखोर टेक्नीशीयनला एसिबीने दिला झटका…
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया,
@दिलीप जय परदेशी
जामनेर (झूम मराठी) जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेतली. महावितरणच्या (Mahavitaran) टेक्नीशीयनसह खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत विभागाच्या (Jalgaon ACB) पथकाने वीज कंपनीच्या आवाराहत रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण कंपनी विभागात एकाच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील रहिवाशी असून त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी यांनी दोन हजार रूपये डिमांड नोट भरण्यासाठी घेतले होते. तरी देखील वीज मीटर लावलेले नव्हते. मात्र आता पुन्हा वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजाराची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
सदर सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाणे. एएसआय. दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक जनार्दन चौधरी, नाईक किशोर महाजन, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.




