ब्रेकिंग

पाचोरा पोलीसांची चाणाक्ष कामगिरी.. औषध पार्सल चोराच्या मुसक्या आवळत, मुद्देमाल केला मूळ मालकाच्या स्वादिन…

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया    @दिलीप जय परदेशी

पाचोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांची चाणाक्ष कामगिरीने औषध पार्सल आलेला सामान मूळ मालकाला न मिळता परस्पर विक्री करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळत, पन्नास हजारांचा औषध पार्सल मूळ मालकाच्या ताब्यात दिले. या कामगिरीने पाचोरा पोलीस कर्मचारीचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहॆ.

सविस्तर असे की जळगाव येथून आठ ते दहा दिवसापूर्वी पाचोरा येथील नवकार मेडिकलचे संचालक यांनी जळगाव येथून मेडिकलचे औषधीचे बॉक्स मागवलेले होते त्यांना पार्सल जळगाव येथून बॉक्स मधील सामान मिळाला होता पण तो कितीचा होता याची कल्पना संचालकाला नव्हती त्यांना बिल मिळाल्यानंतर शंका आली आपल्याला एवढा सामान मिळालेला नाही मग त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेऊन सर्व हकीकत सांगितली त्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल खताळ  यांनी दखल घेऊन त्वरित आपले पोलीस कर्मचारी यांना सूचना दिल्या मग काय पोलीस कर्मचारी राहुल बेहरे, विश्वास देशमुख, योगेश पाटील यांनी आपली चक्र फिरवून पाचोरा शहरातील सर्व औषधं विक्रेत्यांची विचार पूस करून सर्व हकीकत सांगितली व आपल्याकडे कोणी मेडिकलचे सामान विक्री करण्यास आल्यास आम्हाला कळवावे शेवटी गुन्हेगार हा कितीही चाणाक्ष असलातरी पोलिसांच्या नजरे तून सुटत नाही. मेडिकलचे पार्सल हे परस्पर हे विक्रीच्या उद्देशातून त्याने गायब केले होते. त्यानुसार त्यांनी चार-पाच दिवस गेल्यानंतर त्या चोराने तो बॉक्स एका औषध विक्रेत्यास विकण्यासाठी आणला असता सी. सी. टी. व्ही. च्या कॅमेऱ्याच्या आधाराने चोराची ओळख पटली आणि मग पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व नेहमी सतर्क असलेले पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी राहुल बेहरे, विश्वास देशमुख, योगेश पाटील यांनी त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळून मुद्देमालासह त्याला ताब्यात घेतले.  औषधाचं पार्सल मूळ मालकास परत दिला. त्याबद्दल पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे या कामाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहॆ.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे