आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील आखातवाड्यात कानबाई उत्सव मोठया उत्साहात…

पाचोरा (संजय परदेशी) तालुक्यातील आखतवाडे गावात खान्देशाचे आराध्य दैवत असणा-या कानुमातेचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. आखतवाडे गावातील पोलीस पाटील दगडूसिग गिरासे व विजय चौधरी यांच्या घरी सोमवारी सकाळी वाजत-गाजत कानुमातेच्या विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सर्वांना तसेच मित्रमंडळी, नातेवाईकांना एकत्र आणून मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला या उत्सवात ना गरीब, ना श्रीमंत असा भेदभाव न करता मानवतेच्या भावनेतून माणुसकी जपली जाते. विशेष म्हणजे अनेक वर्षांचे वैरही कानुमातेच्या साक्षीने नाहीसे होतात असे म्हटले जाते.

श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर कानुमातेचा उत्सव साजरा केला जातो. मातेची एक दिवसीय स्थापना करून रात्रभर जागरण केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून नदीवर कानुमातेचे विसर्जन केले जाते. कानुमातेच्या उत्सवासाठी बाजारपेठेतून कानुमातेचे मुखवटे आणि सर्व श्रृंगार, पुजा विधीचे साहित्य तसेच सजावटीच्या साहित्यातून रांगोळी काढून कानुमातेची स्थापना करण्यात येते.पूजाविधीनंतर सामूहिक आरती करून पुरणपोळीचा नैवैद्य कानुमातेसमोर ठेवण्यात येतो. यामध्ये मराठी, अहिराणी, हिंदी भाषेतील गाण्यांवर महिला ठेका धरतात. यावेळी ढोल-ताशे, डिजे, पारंपरिक वाद्यावर देखील महिला- पुरूष, लहान बालगोपाळ ठेका धरतात. आणि रात्रभर जागरण करून दुस-या दिवशी सकाळी विधीवत पूजा करून विसर्जन मिरवणूक काढून नदीकिनारी पाण्यात बुडवून देवीचे विसर्जन केले जाते. अशा प्रकारे दोन दिवसांच्या या उत्सवात खान्देशात आनंदमय वातावरण असते. कानुमातेचा उत्सव हा महाराष्ट्रात फक्त खान्देशात साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवाला फार महत्त्व आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे