Pachora | तालुक्यातील शेवाळे शेत शिवारात खड्डा करून अडवलेला शेतरस्ता तहसीलदार बनसोडे यांनी वहिवाट कायद्या प्रमाणे केला पूर्वव्रत…
झूम ऑनलाईन न्यूज | दिलीप जय परदेशी.
पाचोरा | पाचोरा तालुक्यातील मौजे शेवाळे शेतशिवारात वाहिवाट दावा अर्जदार, प्रतिवादी व्यक्ती, तसेच गावातील सरपंच सह पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, वकील यांचे समवेत मौजे, शेवाळे गावातील गट नं. 255/1/अ या ठिकाणी तहसीलदार विजय बनसोडे यांनी लोकअदालत घेऊन अडवलेला रस्त्यातील खड्डा बुजवून वाहिवाट रस्ता पूर्ववत केल्याने आनंद व्यक्त होत आहे.
कायद्याप्रमाणे शेतकऱ्याचा रस्ता पूर्वापार वापरात असेल तर तो कोणालाही अडवता येत नाही, असाच प्रकार पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावात शेतशिवारात वाहिवाट दावा अर्जदार यांनी (विश्वास बाबुराव पाटील, रा शेवाळे) यांनी मामलेदार कोर्टचे कलम-5 प्रमाणे वहिवाट दावा दाखल केलेला होता, सदर दाव्यात यापूर्वी स्तळ निरीक्षण करण्यात आलेले होते, तसेच दि. 31/07/2025 सुनावणी देखीत घेण्यात आलेली आहे. सदर सुनावणी चे दिवशी अर्जदार व सामनेवाले तडजोडीस तयार असल्याची बाब निदर्शनास आल्याने, संबंधित शेतजमीनीच्या ठिकाणी लोक अदालत घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. सदर आज दि. 06/ऑगस्ट/2025 रोजीचे लोक अदालत मध्ये अर्जदार व सामनेवाले, दोन्ही पक्षकार वकील, पोलिस पाटील व इतर शेतकरी यांचे समवेत सामनेवाले गणेश पाटिल यांचा गट नं 255 च्या पश्चिम बांधच्या लगत आलेला रस्ता सामनेवाले गणेश पाटील यांचा शेतातून चालु ठेवावा, सामनेवाले गणेश पाटिल यांचा शेताला पश्चिमेकडे ज्याठिकाणी अर्जदार राजधर भगा पाटील यांची शेतजमीन लागते, त्या ठिकाणी मोजणीची खूण जेथे रोवली जाईल, त्या मोजणीच्या खुणेच्या पश्चिमेकडून अर्जदार राजधर पाटील यांच्या शेतातून रस्ता पुढे दक्षिणेकडे जाणार आहे.

अर्जदार व सामनेवाले यांनी त्यांच्या शेतजमीनीची मोजणी स्वखर्चाने लवकरात लवकर करुन घ्यावी. तोपर्यंत सद्यस्थितीत जो रस्ता आहे त्या रस्त्याला कोणीही हरकत अडथळा घेऊ असे तहसीलदार विजय बनसोडे यांनी निकाल देऊन अशी तडजोड झाल्याने अडवलेला रस्त्यातील खड्डा बुजवून वाहिवाट रस्ता पूर्ववत केला व सर्वांचे आभार मानून लोकअदालात संपविण्यात आली.
- शेतातील रस्ता अडवला तर आवश्यक कायदेशीर गोष्टी
एखादा शेतकऱ्याचा रस्ता पूर्वापार वापरात असेल तर तो कोणालाही अडवता येत नाही. त्यासाठी तहसीलदाराकडे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम पाच अनुसार अर्ज दाखल करावा लागतो व ज्या व्यक्तीने रस्ता आडवला आहे त्याला प्रतिवादी करावी लागते. यामध्ये रस्ता अडवण्याची घटना घडल्याची तारीख व वेळ सविस्तर माहिती लिहावी लागते.




