आपल खान्देशआरोग्य व शिक्षणब्रेकिंग

खाजगी नर्सरी, केजी शाळांची भरमसाठ फी.. या शाळांना चाप बसणार कधी…?

झूम ऑनलाईन |  दिलीप जय परदेशी

आपल्या लहान मुलांच्या शैक्षणिक वाटचालीचे पहिले पाऊल म्हणून ओळखल्या जाणार्‍या खासगी नर्सरी, केजी शाळांना परवानगी नसतानाही जागोजागी त्याचे पेव फुटलेले दिसते. विदेशी नावाच्या या गोंडस नावाच्या  शाळे मुळे बालवाडीत आपल्या मुलाला पाठवने कमी पणाचे दिसून येत आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात यांचा समावेश करावा.

आपल्या परिसरात चालणाऱ्या खासगी नर्सरी आणि केजी शाळांची शिक्षण विभागाची नोंद असणे गरजेचे आहे. खासगी नर्सरी, केजी शाळेतील शिक्षकांची नेमणूक करताना त्यांचे शिक्षण, शैक्षणिक अभ्यासक्रमाचा कोर्स याचा विचार केला जात नसल्याचे काही ठिकाणी आढळून आले आहे, याशिवाय नर्सरी, केजी शाळांना किती जागा असावी, तेथील सोयी-सुविधा, वाहतूक सुविधा, सुरक्षिततेच्या उपाय योजनां विषयी नियम पाळले जातात का?  फी बाबत मनमानी असते.  नर्सरी, केजी प्रवेशासाठी आकारल्या जाणार्‍या भरमसाट फी विरोधात शासनाचे कोणतेही नियम का? नाहीत. हे कोण तपासणार त्यासाठी शिक्षण विभागाला जाग येणार कां? कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेल्या आणि कोणाचेही नियंत्रण नसलेल्या अशा शाळांना चाप बसणार कधी असा प्रश्न निर्माण होतांना दिसून येतोय यावर काय उपाय योजना करते याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे