महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नगराज पाटील तर पाचोरा शहराध्यक्ष भुवणेश दुसाणे
झूम मराठी वृत्त
पाचोरा (झूम मराठी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हा ग्रामीण व पाचोरा शहराध्यक्ष पदासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस, विभागीय व जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले. खान्देश विभागातून पाचोरा शाखा संघटनेच्या वतीने पत्रकारांना छत्री, रेनकोट वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी कुरंगी तालुका पाचोरा येथील लोकमत पत्रकार नगराज माधवराव पाटील यांची नियुक्ती म. रा. मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले. यावेळी पाचोरा शहर संघटनेच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील दर्शन पोलीस टाईम्स चे जिल्हा प्रतिनिधी भुवणेश दुसाणे यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतील पत्रकार बांधवानी त्यांचे अभिनंदन केले.





