देश-विदेश

दिल्लीत लॉकडाऊन आठवडाभरासाठी वाढवला

दिल्लीत करोनाचं संकट आणखी गडद होत असल्याने आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. रुग्णवाढीचा वेग, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालायवरील ताण कमी करण्यासाठी करोना साखळी तोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

दिल्ली सरकारने एका आठवड्याने लॉकडाऊन वाढवल्याने आता १० मे पर्यंत सकाळी ५ वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. मागील दोन आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याची मुदत सोमवारी सकाळी ५ वाजता संपणार होती. मात्र करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने आणखी आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दिल्लीत लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवलं आहे’, असं ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे