पाचोरा तहसील रेकॉर्ड रुममध्ये सुरु असलेला सावळा गोंधळ त्वरित थांबवा – हरीभाऊ पाटील
पाचोरा तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुम (अभिलेख कक्ष) सताड उघडे पडलेले असते या कक्षात कुणीही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने रेकॉर्ड रुममध्ये खाजगी पंटर वावरतांना व महत्वाचे सरकीरी दप्तर हाताळतांना दिसून येतात व हे खाजगी पंटर त्यांच्या सोयीनुसार रेकॉर्ड रुममध्ये घुसून पाहिजे ती फाईल व कागदपत्रांची छाननी करुन वेळ प्रसंगी त्याला हव्या असलेल्या मिळवून घेतो हा गैरप्रकार येथेच थांबत नसून हे खाजगी पंटर त्याला हवे असलेले लिखाण करुन फेरबदल करत करुन परस्पर कागदपत्रांमध्ये फेरबदल करत असल्याचा आरोप बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरीभाऊ पाटील यांनी केला असून रेकॉर्ड रुममध्ये गाववाईज ठेवलेल्या फायली अस्तव्यस्त ठेवल्या जात असल्याने गरजू लोकांना हवी वेळेवर पाहिजे ती कागदपत्रे मिळवून घेण्यासाठी वारंवार खेट्या माराव्या लागतात असा अनुभव गरजूंना येत असल्याने लोकाची कामे वेळेवर होत नाहीत.
तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुमचा गैरप्रकार थांबवण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी साहेब व माननीय तहसील साहेब यांनी वेळी लक्ष देऊन आपल्या नियमानुसार एका शासकीय कर्मचाऱ्याची कायमस्वरुपी नेमणूक करुन खाजगी पंटर या रेकॉर्ड रुममध्ये फिरकणार नाही याची काळजी घ्यावी कारण खाजगी पंटर हे आर्थिक लोभापायी संबंधितांना हवी तशी कागदपत्रे बनवून देत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या रेकॉर्ड रुममध्ये असलेल्या जुन्या नोंदींचे बारकाईने निरीक्षण केल्यास जुन्या व नव्याने लिहिलेल्या अक्षरात व शाईमध्ये फरक दिसून येईल यात तिळमात्र शंका नसल्याचे मत बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरीभाऊ पाटील यांनी व्यक्त केले असून रेकॉर्ड रुममध्ये सुरु असलेला सावळा गोंधळ त्वरित थांबवण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी साहेब व मा. तहसीलदार साहेब तातडीने पावले उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



