महाराष्ट्रराजकीय

भाजप भटके विमुक्त आघाडी, कोकण विभाग अध्यक्षपदी सतीश गिरी तर सरचिटणीसपदी योगेश परदेशी यांची वर्णी


भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाची विधानसभा 2024 साठी महाराष्ट्र राज्यव्यापी संघटनात्मक बैठक प्रदेश अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्यानंतर भाजपच्या कोकण विभाग भटके विमुक्त आघाडी अध्यक्षपदी सतीश गिरी तर सरचिटणीस पदी ॲड. योगेश परदेशी यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

 

भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाची विधानसभा 2024 साठी महाराष्ट्र राज्यव्यापी संघटनात्मक बैठक प्रदेश अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अभ्यासात्मक शैलीतून सर्वांना वैचारिक संघटनात्मक मुद्यांच्यावर मार्गदर्शन केले, भाजप प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी यांनी हिंदुत्ववादी विचारांची झालर घालून वैचारिक पेरणी करून मंत्रमुग्ध केले. 

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी, कोकण विभाग अध्यक्ष पदी सतीश गिरी सरचिटणीस योगेश परदेशी यांची निवड भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी मा. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भगवान कराड, भाजपा प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी, संजय भाऊ केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुंबई प्रदेश कार्यालया येथे करण्यात आली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी, युवराज जी मोहिते, राजू साळुंखे, प्रदेश कार्यालय प्रमुख ॲड. दिपक पाटील, राज खैरनार, नाशिक शहर अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, कल्याण जिल्हा अध्यक्ष सांगळे साहेब, कल्याण लोकसभा संयोजक महेंद्र भाऊ परदेशी, संतोष भाऊ पाटील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 सतीश गिरी आणि ॲड. योगेश परदेशी यांचे समाजमाध्यमातून अभिनंदन व  राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाचां वर्षाव होतांना दिसत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे