आपल खान्देश

पाचोरा बस स्थानक कामाचे भूमिपूजन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते

पाचोरा (झूम मराठी) राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाचोरा बसस्थानकाच्या आवाराचे काँक्रीटीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे या 300 लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली असून आज आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.


स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पाचोरा व भडगाव बस स्थानकासाठी सुनियोजित निधी करून आणला व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी मान्यता दिल्यानुसार महामंडळाच्या जागेच्या विकासासाठी आराखडे व कामाचे स्वरूप सादर करण्यात आले होते संकल्पीय आराखड्यास मान्यता देण्यात आली असून लवकरच पाचोरा व भडगाव बसस्थानक कात टाकणार, पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पाचोरा व भडगाव बस स्थानक चेहरा मोहरा बदलणार असा नागरिकांना सांगितले होते आणि पाचोरा बस स्थानक आवाराचे काँक्रीटीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे यासाठी 300 लक्ष रुपयांच्या कार्याचे तसेच भडगांव बस स्थानक आवाराचे काँक्रीटीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे या 125 लक्ष रुपयांच्या कार्याचे भूमिपूजन आज दिनांक १३/१०/२०२४ रोजी, संपन्न झाले या कार्यामुळे दोन्ही शहरांच्या बस स्थानकाचे रूप बदलणार आहे. तसेच या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे