देश-विदेश

मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी चहावाल्याची १०० रुपयांची मनीऑर्डर…

डोक्याचे केस आणि दाढी वाढवत साधूची वेशभूषा करून देशाच्या समस्या सुटणार नाहीत. वाढवायचेच असेल तर लसीकरण वाढवा, आरोग्याच्या सोयी वाढवा, मागील दीड वर्षांपासून टाळेबंदीच्या नावाखाली रोजगार बुडाल्यांना रोजगार द्या. अशा आशयाचे पत्र लिहून बारामतीतील एका चहावाल्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाढी व कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे.

अनिल संभाजी मोरे असे या चहा विक्रेत्याचे नाव आहे. बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारका समोर रस्त्याच्या कडेला मोरे अनेक वर्षांपासून एका छोट्याशा स्टॉलवरून चहाची विक्री करतात. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

मात्र, वारंवार होत असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक दिवस चहाचा स्टॉल बंद असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. टाळेबंदीमुळे नागरिकांना मूलभूत गरजा भागवणे ही मुश्कील बनले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मी माझ्या व्यवसायातून कष्टाने कमावलेले शंभर रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केले असल्याचे मोरे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे