जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ओळखपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी लागेल; अशी माहिती जिल्हाधिकारी तथा तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी दिली.
तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समितीचे सचिव योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन (NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON) हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यावर तृतीयपंथीयांनी नावनोंदणी करून आपले ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. तृतीयपंथीयांच्या समस्या जिल्हास्तरीय समितीकडे आल्यावर तत्काळ कार्यवाही करावी. या तक्रारी, समस्यांचे विहित कालावधीत निवारण करण्यात यावे. प्राप्त तक्रारींबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाकडे शिफारस करावी. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. त्यांच्यासाठी लसीकरण शिबिराचे नियोजन करावे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा