महाराष्ट्र

लसीकरणासाठी 24 तासांत एक कोटी लोकांनी केली नोंदणी

भारतामध्ये एक मे 2021 पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. CoWIN आणि Aarogya Setu अॅपवर लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करावी लागते. बुधवारी नोंदणीला सुरुवात झाली. अवघ्या एका दिवसात तब्बल एक कोटी लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. बुधवारी सकाळपासून भारतीयांनी अॅपवर नोंदणीसाठी घाई केली. काही वेळासाठी CoWIN अॅप क्रॅशही झालं होतं. असं असतानाही 24 तासांत एक कोटींपेक्षा लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

MyGovIndia द्वारा ट्विटवर माहिती देण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत दिवसभरात एक कोटींपेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली आहे. Cowin आणि Aarogya Setu अॅपशिवाय Cowin पोर्टलवरुनही नोंदणी करता येते. पण पोर्टलवरही नोंदणीसाठी समस्या पाहायला मिळाल्या. लोकांनी सोशल मीडियावर याबाबात आपली नाराजी व्यक्त केली. Cowinregistration सोबत Cowindown या हॅशटॅगसह लोकांनी आपल्या समस्या मांडल्या. Cowin च्या संकेतस्थळ अॅक्सेस मिळालं तरीही लोकांना रजिस्ट्रेशनमध्ये अडचणी येत होत्या. बुधवारी दिवसभरात एक कोटींपेक्षा जास्त जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

आधार कार्डच्या माध्यमातून नोंदणी

(CoWIN App) वर नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य असेल. लस देण्यापूर्वी 12 भाषेत नागरिकांना मेसेजच्या माध्यमातून सूचित करण्यात येईल. लसीकरण मोहिमेत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांनाही याची माहिती मिळणार आहे. लसीकरणाचे दोन डोस घेणाऱ्यांना क्यूआर कोडच्या आधारावर प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे