ब्रेकिंग

अखेर गर्दी पांगविण्यासाठी पाेलिसांना करावा लागला लाठी चार्ज

मलकापुर (जि. सातारा) : कराड नजीकच्या मलकापुर शहरातील एका फर्निचर शोरूमला आग लागली. आज (गुरुवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुणे बंगळूर आशियाई महामार्ग लगत असलेल्या लाेटस शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही वेळातच धूराचे लाेट माेठ्या प्रमाणात दिसू लागल्यानंतर नागरिकांना त्या ठिकाणी धाव घेतली.

तेथूनच काहींनी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला फाेन केले. आगीने राैद्र रुप धारण केल्याने धूराचे लाेट माेठ्या प्रमाणात पसरले. यामुळे महामार्गासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. पाेलिस देखील घटनास्थळी पाेचले. आकाशात उंचीपर्यंत धुराचे लोट पसरले होते.

आग पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढली.अखेर गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. लोटस फर्निचरच्या शाेरुमधील सारे साहित्य आगीत बेचिराख झाले आहे. ही आग कशामुळे लागली आणि आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती तूर्तास मिळू शकली नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे