आपल खान्देश
सर्पतज्ज्ञ, लेखक नीलमकुमार खैरे हे उद्या पाचोऱ्यात
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, व सर्पमित्र यांना अधिक माहिती मार्गदर्शन करण्यासाठी सर्पतज्ज्ञ, लेखक असलेले नीलमकुमार खैरे हे उद्या शुक्रवारी पाचोरा येथे 12 वाजता ठिकाण राजीव गांधी टाऊन हॉलला येणार आहेत, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भूषणदादा मगर (पाटील) असणार असून स्वागतोत्सुक म्हणून वेब मीडिया असोसिएशन पाचोरा, निसर्गराज वन्यजीव रक्षक पर्यावरण वादी बहुउद्देशीय संस्था पाचोरा पदाधिकारी व सदस्य असणार असून असे अनमोल मार्गदर्शन घेण्यासाठी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन निसर्गराजा न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक श्री. अतिश एस. चांगरे यांनी केले आहे.
कोण आहेत निलमकुमार खैरे?
निलीमकुमार खैरे हे सर्पतज्ज्ञ, लेखक आहेत. महराष्ट्रात पुण्यामध्ये कात्रज येथे सर्पोद्यान उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहेत. नीलमकुमार खैरे सध्या कात्रज सर्पोद्यानाचे संचालकपद सांभाळत आहेत. महाराष्ट्रात सापांविषयी जागृती वाढवण्यासाठी गावोगावी, शाळा-महाविद्यालयात जाऊन सापांविषयी माहिती देणे, साप कसे ओळखावेत, साप चावल्यावर कोणते उपचार करावेत, साप कसे हाताळावेत यावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देऊन त्यांनी सातत्याने काम केले आहे. सापांविषयी जागृतीसाठी त्यांनी पुण्यात ७२ विषारी सापांसोबत ७२ तास हा आव्हानात्मक कार्यक्रम आयोजला होता. या कार्यक्रमात त्यांनी ७२ तास विविध जातींच्या ७२ विषारी सापांसोबत काचेच्या खोलीत राहून दाखवले.



