गुन्हेगारी

धक्कादायक..दारुड्या मुलाकडून चक्क आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ?

महाराष्ट्रात रोज अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका दारुड्या मुलाने चक्क आपल्या आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडित महिलेने शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावरून 22 वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, 45 वर्षीय पीडित महिलेला पहिल्या पतीपासून 22 वर्षाचा मुलगा आहे. त्याला दारू पिण्याची सवय असून तो कधी पीडित महिलेकडे राहतो तर कधी महिलेच्या पहिल्या पतीकडे राहतो. 30 सप्टेंबर रोजी हा आरोपी मुलगा दारू पिऊन पीडित महिलेच्या घरी आला. दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला पैसे मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने शिवीगाळ केली, त्यामुळे पीडित महिला तिच्या मुलीला घेऊन दुसरीकडे झोपण्यासाठी गेली.

शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान परत घरी आल्यावर आरोपीने स्वतःची आई असलेल्या पीडित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तसेच रबरी पाईपने तिला मारहाण केली आणि जिवे मारून टाकण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडित महिलेने शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. शहर पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु असल्याचे समजते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे