आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोऱ्यात महाविकास आघाडीचे रस्ता रोको आंदोलन…

घोषणा केली आणि पॅकेज ही जाहीर केले. मात्र ह्या फक्त कागदावरच्या घोषणांच्या पाऊस होता. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला फुटकी कवडीही आज पर्यंत मिळालेली नाही असा आरोप करत हे आंदोलन छेडण्यात आले


पाचोरा टुडे | तालुक्यात  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडी ने जारगांव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन केले. 

पाचोरा तालुक्यात मागिल काही दिवसांत अचानक अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे आलेल्या प्रचंड पाण्याने शेतकऱ्यांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. शासनाने पॅकेज च्या नावाखाली या बाधीत शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे. जे अनुदान जाहीर केले ते दिवाळीच्या आधी त्यांच्या बँकखात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड जाईल. अशा मागण्या सह शिवसेना उबाठा सह राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात महाविकास आघाडी ने आज दि १६/१०/२०२५ रोजी पाचोरा जारगांव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी शिवसेना उबाठा चे उपनेते गुलाबराव वाघ, माजी उपजिल्हाप्रमुख ॲड. अभय पाटील, माजी सभापती उध्दव मराठे, रमेश बाफना,कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, अझहर खान,  माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड अविनाश भालेराव या सह पदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी कपाशी साठी सीसीआय सुरू करा,ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना ना. गिरीश महाजन यांनी घटनास्थळावर आमदारांच्या समक्ष जाहीर केलेले घरटी एक लाख त्वरीत द्या, सोयाबीन व ज्वारी ची शासकीय खरेदी त्वरीत सुरू करा, शेतकरी अनुदान घोटाळाची चौकशी त्वरीत करुन ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरीत पैसे द्या, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, खरडुन गेलेल्या जमीनीचे हेक्टरी पाच लाख त्वरीत रोख स्वरुपात द्या, विहीरीत गाळ काढण्यासाठी त्वरीत दोन लाख द्या, दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख द्या, शहरातील पंचनामे केलेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कुमावत यांना देण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश बाफना, माजी उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शेख इस्माईल शेख फकीरा, इरफान मणियार, झानेश्वर पाटील, ॲड. मंगेश गायकवाड, श्रावण गायकवाड, प्रकाश निकम, संदीप पाटील, चेतन बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत पाटील, शिवसेना शहर प्रमुख अनिल सावंत, विनोद बाविस्कर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील, माजी उपसभापती अरुण तांबे, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ, प्रेमचंद पाटील, युवा सेना जिल्हा संघटक प्रशांत पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख निखिल भुसारे, शहर प्रमुख मनोज चौधरी, शहर प्रमुख हरीश देवरे,उपशहर प्रमुख खंडू सोनवणे पप्पू जाधव, भारत पाटील, सर्जेराव पाटील , रतन परदेशी, आनंदा पाटील, पितांबर मिस्त्री गोकुळसिंग गांगुर्डे, सांडू तडवी, अमोल महाजन, चंद्रकांत पाटील, गजू पाटील,भिकन तडवी, गुलाब पाटील, दिनकर गीते. असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार श्री कुमावत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवेदन स्वीकारले व शासनाकडे ते पाठविणार असल्याचे सांगितले.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे