ब्रेकिंग

जगभर धुमाकूळ घालणारा ओमायक्रॉनचा देशात शिरकाव, कर्नाटकात दोन बाधित सापडले

झूम मराठी वृत्तसेवा

जगभर धुमाकूळ घालणारा ओमायक्रॉनचा भारतातही शिरकाव झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात ओमायक्रॉनची 2 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या केसेस कर्नाटकात आढळून आल्या आहेत. 66 वर्षीय पुरुष आणि 46 वर्षीय पुरुषामध्ये ओमायक्रॉन संसर्ग आढळून आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉनची 373 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जग अजूनही कोविडच्या प्रकरणांमध्ये तेजी पाहत आहे. गेल्या एका आठवड्यात, जगातील 70% प्रकरणे युरोपमधून आली आहेत. युरोपमध्ये आठवडाभरात 2.75 लाख कोविड रुग्ण आले आणि युरोपमध्ये एका आठवड्यात 29,000 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

लव अग्रवाल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत, आम्ही देशातील लोकांना 125 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस दिले आहेत. 84.3% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि 45.92% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.  देशात अशी दोन राज्ये आहेत जिथे 10,000 हून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. ते म्हणजे केरळ आणि महाराष्ट्र. केरळमध्ये 44,000 सक्रिय प्रकरणे आहेत आणि महाराष्ट्रात 11,000 प्रकरणे आहेत. कोविडची 55% प्रकरणे देशातील या दोन राज्यांमधून येत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे