महाराष्ट्र

कोरोनाशी लढन्यासाठी आ. नानाभाऊ पटोले यांच्या आमदार निधीतुन ५० लक्ष रुपये.

कोरोनाशी लढन्यासाठी आ. नानाभाऊ पटोले यांच्या आमदार निधीतुन ५० लक्ष रुपये.

देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने वाढतो आहे त्याचप्रमाणे कोरोनाने आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील याचा प्रादुर्भाव हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा तणाव आहे त्याच बरोबर आवश्यक असलेली साधनसामग्री देखील अपुरी पडत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्यामुळे उपलब्ध साधनसामग्री कमी पडत आहे आणि म्हणून कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करण्यासाठी आ. नानाभाऊ पटोले यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत 50 लक्ष रुपये खर्च करण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांना दिलेल्या आहेत. ज्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड, आय सी यू बेड, एन आय सी यु व्हेंटिलेटर्स, इमर्जन्सी ट्रॉली, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्स, आवश्यक सर्व औषधी यांची खरेदी करता येणार आहे. आणि यामुळे भंडारा जिल्ह्याला कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये बळ मिळणार आहे. मात्र ही कोरोना विरुद्धची लढाई लढत असताना नागरिकांनी सर्व प्रकारचे नियमांचे पालन करावे आणि आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच ब्रेक द चेन मध्ये घालून देण्यात आलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करावे व शासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे