पाचोऱ्यातील राहुल महाजन यांची जळगाव महामार्ग पोलिसांच्या ‘मृत्युंजयदूत’ म्हणून नियुक्ती..
जळगाव (झूम मराठी वृत्त) महाराष्ट्र राज्यातील महामार्ग पोलिसांच्यावतीने हायवेरील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी तसेच अपघातग्रस्ताना तात्काळ मदत मिळावी यासाठी महामार्ग पोलिसांच्या वतीने महामार्ग तसेच रस्त्यावर झालेल्या अपघातात मदत मिळावी यासाठी महामार्ग मृत्युंजय दूत हि संकल्पना हाती घेतली असून, त्यात पाचोरा जळगाव महामार्गवर नेहमीच अपघातग्रस्त यांना तातळीने मदत करणारे पाचोऱ्यातील राहुल महाजन यांची महामार्ग मृत्युंजय दूत म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
महामार्गावर अपघातात मदत मिळाली नाही तर जीव गमवावा लागतो, अपघातात गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्त यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा जीव जातांना आपण रोज बातमी वाचत असतो याला आळा बसावा यासाठी महामार्ग मृत्युंजय दूत हि संकल्पना हाती घेतली असून, यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाळधी महामार्ग केंद्र अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक रविंद्रकुमार सिंगल (महामार्ग पोलीस) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या हस्ते पाचोरा येथील पत्रकार तसेच पाचोरा-जळगाव महामार्गावरील हॉटेल व्यवसायिक राहुल महाजन यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. महाजन हे नियमित खेडगाव नंदीचे ता.पाचोरा जि.जळगाव व आपल्या हॉटेल मधुर जवळील तसेच आजू बाजूच्या परिसरात कुठेही अपघात झाला असल्यास तात्काळ मदतीसाठी पोहचून अपघात ग्रस्तांची मदत विनामूल्य करत असून त्यांना जळगाव पाळधी येथील महामार्ग पोलिसांकडून महामार्ग मृत्युंजयदूत म्हणून गौरविण्यात आले असून त्यांना पोलीस निरीक्षक मा. भामरे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. पाळधी येथे आयोजित कार्यक्रमात पाचोरा, एरंडोल, जळगाव, पारोळा तसेच महामार्ग लगत नियमित अपघात ग्रस्त इसमांना मदत करणाऱ्या विविध मृत्युंजय दूतांना रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव शाखेच्या वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात ग्रस्त इसमांना कश्या पद्धतीने मदत करावी याबाबत मार्गदर्शन केले असून पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्यावतीने योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. त्याच बरोबर यानंतरही विविधी कार्यक्रम राबविण्यात येथील आपणच आमचे कान-नाक-डोळे आहेत योग्य ती माहिती वेळोवेळी पोलिसांना कळवा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी यांनी केले आहे.



