आपल खान्देशमहाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट!

मुंबई | राज्याच्या राजकारणात भेटी गाठींचा सिलसिला सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे. नेमकी ही भेट का झाली याचं कारण अस्पष्ट असले तरी सुप्रिया सुळे यांनी चर्चेसाठी भेट घेतल्याचं फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी भेट घेतली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भेट घेतली होती. त्यामुळे आता खडसे आणि सुप्रिया सुळे यांच्यात काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झालं – रक्षा खडसे

३१ मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठा पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.

“या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती,” असं देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे