… तर मी चोप दिल्याशिवाय राहणार नाही; रोहिणी खडसेंचा शिवसेनेच्या नेत्याला इशारा
मक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पोस्टवरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या घरावर धडक दिली . यादरम्यान कार्यकर्ते महिलेच्या अंगावर धावून गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर रोहिणी खडसे यांनी मतदारसंघातील महिला सुरक्षित नसल्याचे ट्वीट करत प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
समाज माध्यमांवर कुणी काय पोस्ट करावे हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आमच्या विरोधातही अनेक पोस्ट येत असतात. एखाद्या महिलेवर भररस्त्यावर अन्याय होत असेल, तर यापुढे महिला शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली.
माता जिजाऊंच्या आम्ही लेकी आहोत असे असताना एखाद्या महिलेच्या अंगावर जर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न करत असेल ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. तर, महिलांवर कोणी अत्याचार करत असतील तर मी त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असंही रोहणी खडसे म्हणाल्या आहेत. मुक्ताईनगरमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात आमदार पाटील यांनी खडसे पिता-पुत्रीकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. यानंतर मुक्ताईनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
माहितीनुसार, पीडित महिलेचे पती राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी असून, त्यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर केली होती. त्याचा राग आल्याने शुक्रवारी रात्री १०.२२ ला ईश्वर हटकर याने महिलेच्या पतीला फोन करून धमकी दिली. रात्री साडेदहाला ईश्वर हटकरयांनी त्यांच्या घरासमोर येऊन राडा केला. तसेच शिवीगाळ करीत ठार करण्याच्या धमक्याही दिल्या. आम्ही आमदार चंद्रकांत पाटलांची माणसे आहोत’ असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. त्याच वेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील त्याठिकाणी आले आणि खडसेंच्या नावाने शिवीगाळ करून ‘ईडी’चे दोन कोटी कुठे गेले, अशा शब्दात टोलेबाजी केली . घराबाहेरील गर्दी पाहून पीडितेने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ॲड. रोहिणी खडसे यांना फोन केला. त्यानंतर हा वाद शमला . या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिकारी प्रदीप शेवाळे या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.
समाज माध्यमांवर कुणी काय पोस्ट करावे हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आमच्या विरोधातही अनेक पोस्ट येत असतात. एखाद्या महिलेवर भररस्त्यावर अन्याय होत असेल, तर यापुढे महिला शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली.




