महाराष्ट्र

गुड बाय आबा….

एक पक्ष, एक विचार आणि एका मतदारसंघातून सातत्याने ११ वेळा विधानसभेवर निवडून येणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे गुरुवारी निधन झाले. साधी राहणी, तत्त्वनिष्ठ आणि कष्टकरी, वंचितांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या गणपतराव देशमुख याच्या विषयी जेष्ठ साहितीक बापूसाहेब हटकर यांचा लेख वाचा

जन गण मन अधिनायक जय हे

या राष्ट्रगीतातील गणं अधिनायक म्हणजे गणपती ते गणपतराव देशमुख. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अद्भुत चमत्कार म्हणजे गणपत आबा.
गणपत आबांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 चा म्हणजे येत्या 10 ऑगस्ट 2021 ला आबा पूर्ण 95 वर्ष वयाचे झाले असते. या 95 वर्षाला केवळ 11 दिवस कमी असताना आबानी आपली भूलोकीची यात्रा संपवली.
आबा कायदे पंडित होते. सुरवातीला ते वकिली करत असत. नंतर त्यांनी राजकारण हे आपलं ध्येय निश्चित केल्यावर त्यांनी शेकाप च्या तिकिटावर पहिली विधान सभेची निवडणूक 1962 साली लढवली आणि जिंकली. पुढे एक अपवाद वगळता ते तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले. ई स 1962 ते 2019 या काळात आबा 58 वर्ष विधान सभेत आमदार होते. ते दोन वेळा एक दोन वर्षासाठी कॅबिनेट मंत्रीही झाले होते. त्यांनी त्यावेळी आधी कृषी पाट बंधारे नंतर सहकार पणन ही खाती भूषविली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक रेकार्ड करून ठेवले आहेत. ते पुढे कोणीही मोडू शकणार नाही.
1 आबा 11 वेळा म्हणजे 58 वर्षे आमदार झाले.
2 त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 18 मुख्यमंत्री सोबत काम केले आहे. त्यात यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री तर फडणवीस हे शेवटचे मुख्यमंत्री होते.
3 आबांनी त्यांची संपूर्ण कारकीर्दी शेकाप या एकाच पक्षात काढली आहे. हे रेकार्ड तर कोणीच मोडू शकणार नाही. महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील नेते, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, सुशील कुमार शिंदे, अब्दुल रेहमान अंतुले, बाळासाहेब विखे, सुधाकरराव नाईक, राधाकृष्ण विखे, नारायणराव राणे, गोविंदाराव आदिक, सर्व मोहिते घराणं. या सर्वांनी आपले पक्ष बदलले आहेत पण आबानी त्यांचा शेकाप पक्ष कधीच सोडला नाही. त्यांच्या तिसऱ्या पिढीतील नातवाला सुद्धा त्यांनी शेकाप मधूनच निवडणूक लढवायला लावले आहे. अशा प्रकारे पक्षावर निष्ठा असणारा नेता संपूर्ण देशात क्वचित सापडेल.
आबांनी त्यांच्या कारकिर्दीत एक सूतगिरणी आणि एक साखर कारखाना उभा केला. साखर कारखाना काही चालला नाही पण सूत गिरणी अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. त्यांचा सांगोला-मंगळवेढा मतदार संघ तसा दुष्काळी प्रदेश आहे. तिथे शेतकऱ्यांना पाणी मिळावे या साठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले.
आबांची सभागृहांतील भाषण म्हणजे नव्या जुन्या आमदारांसाठी पर्वणीच असायची. आबा तत्वनिष्ठ राजकारणी होते. आबा 58 वर्ष आमदार असूनही ते st बस मधून प्रवास करायचे. विधान सभेत धनगर आरक्षणाला सर्वात प्रथम तोंड आबा नी फोडल होत. असा हा कर्मयोगी आज इह लोकीची यात्रा सोडून परलोकीच्या यात्रेसाठी निघाला आहे.

जब आए संसार तब जग हसे हम रोये।
ऐसी करणी कर चले हम हसे जग रोये।

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे