दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; वाचा कधी होणार?
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
पुणे – शालेय शिक्षण विभागाने दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्य़ण घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याची माहिती दिली. विद्यार्थ्यांकडून याबाबतची मागणी केली जात होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच दहावी बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय़ घेतला गेला.
सीबीएसी आणी आसीएईसह आयबी, केंब्रिज बोर्डाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याबाबत विनंती करण्यात आल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसंच राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून दहावी बारावीच्या परीक्षा मे अखेरीस ते जून महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

दहावीची परीक्षा जूनमध्ये घेतली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइनच होणार आहे. याआधी पहिली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच निर्णय घेण्यात आला होता.



