आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी….
गाडीच्या मागच्या काळ्या काचावर मोठ्या अक्षरात सरपंच लिहून परिवर्तन होत नसतं, त्यासाठी वाईटाच्या कंबरात लाथ मारावी लागते. राज्यातील एक गाव नसेल जिथे हा व्हिडिओ पोहचला नसेल, अलीकडच्या काळातील दोन घटना आहेत,
पेन्शन साठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अन विहीरीसाठी हे सरपंच पैसे आंदोलन…
दोन्ही आंदोलनातला फरक लक्षात येईल.
पेन्शन आंदोलनाची सर्वसामान्य माणसाकडून टिंगलटवाळी झाली, कडाडून विरोध झाला, अन ह्या आंदोलनाला विरोध करणारा एकही व्यक्ती राज्यात नसेल, कारण राज्यातील सर्वच पंचायत समिती, न्हवे तर सगळ्याच्या सगळ्या कार्यलयातील ही खरी स्थिती आहे.
सरकार कोणाचंही असो, नेहमीच हा गरिबांच्या घामाचा पैसा लुटारूंच्या खिशात जातोय. गरिबांचं रक्त पिणाऱ्या, शेण खाणाऱ्या लोकांना लाज वाटेल…
खरं तर आभाळ फाटलंय, ठिगळ लावणं केवळ अशक्य आहे, तरीही गावोगावी असे सरपंच झाले तर परिस्थिती सुधारू शकते.
जिंकलंय सरपंच तुम्ही जिंकलय !!

