आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गौरव समारंभ संपन्न.

भडगाव (संभाजी पाटील) भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या वर्षात घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.

 सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत व्यंकट पाटील, प्रमुख पाहुणे शिवचरित्रकार व्याख्याते सुनिल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक वाटप करण्यात आले त्यातील काही निवडक स्पर्धा व त्यातील यशवंत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन  प्रथम व जिल्हास्तरावर निवड पियुष पाटील, लोकेश पाटील, शिवेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली, तालुकास्तरीय धाव शर्यत जिल्हास्तरावर निवड साई अशोक मराठे, तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा द्वितीय- मितेश बापुराव पाटील, एकलव्य सामान्य ज्ञानपरीक्षेत गुंजन सुभाष महाजन, भावेश विजय पाटील, तसेच भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा शाळेतून प्रथम जयेश विजय देसले यासर्वांना गौरविण्यात आले.

 याप्रसंगी शाळेतून प्रतिनिधिक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व व गीतगायन सादर केले त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, खजिनदार व पदाधिकारी, शाळेचे निवृत्त जेष्ठ उपशिक्षक  एस .डी पाटील, तिनही गावातील जि.प.शाळेचे शिक्षक प्रतिनिधी, तिनही शाळांचे शालेय समिती चे सदस्य, बांबरुड बु.चे सरपंच प्रतिनिधी, भटगाव माजी सरपंच  पद्मसिंह परदेशी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुुञसंचलन एस पी पाटील सर, प्रास्ताविक बी.जी.पाटील सर तर आभार मुख्याध्यापक ए.आर पाटील सर यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे