आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

डिजिटल हेल्थ कार्ड: ऑनलाईन नोंदणी, फायदे, तोटे सविस्तर माहिती | ABHA Digital Health ID Card

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

भारत सरकारच्या आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ आयडी कार्ड मिशन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजे काय, ABHA नंबर म्हणजे काय, या डिजिटल हेल्थ कार्डचे फायदे, तोटे काय आहेत इत्यादी माहिती बघणार आहोत.

 मित्रांनो, डॉक्टर कडे जाताना प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स घेऊन जावे लागतात का, तुमच्या तुमच्या मागच्या आजार विषयी माहिती सांगावी लागते का, तर मग आता काळजी करण्याची काही गरज नाही, कारण आता भारत सरकारने नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा प्राप्त होण्यासाठी डिजिटल हेल्थ आई डी कार्ड ही सुविधा सुरू केली आहे.

डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजे काय?

मित्रांनो आपल्या पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ला येथे आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ आयडी कार्ड या अभियान संबंधित एक घोषणा केली होती. या अभियाना अंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिकाला एक हेल्थ आयडी कार्ड देण्यात येणार आहे. हा आयडी क्रमांक 14 अंकी असणार आहे. ज्यात त्या नागरिकाच्या आरोग्य विषयक सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरूपात सेव्ह राहणार आहेत. म्हणजे च या हेल्थ आयडी कार्ड मध्ये एखादा नागरिक भारतात कुठेही उपचार घेत असेल तर त्याला कोणता आजार आहे, या आधी त्या आजारा वर उपचार कुठे व कधी घेतली या संबंधीचे सर्व रेकॉर्ड्स किंवा सर्व वैद्यकीय टेस्ट संबंधित सर्व रेकॉर्ड्स या कार्ड मध्ये असणार आहेत.

कार्ड अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असे आहे, की नागरिकांना आपल्या हेल्थ विषयीच्या सर्व नोंदी, सर्व रेकॉर्ड्स एकाच ठिकाणी ठेवता याव्यात. थोडक्यात, आरोग्य संबंधित सर्व रेकॉर्ड्स हे पेपरलेस करून डिजिटल करणे. तसेच आपल्या आरोग्याच्या संबंधित असणारे इतर जुने रेकॉर्ड्स ही आपल्या हेल्थ आयडी शी कधीही लिंक करता याव्यात. 

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड कसे बनवायचे त्या बद्दल माहिती जाणून घेऊ या…

डिजिटल हेल्थ कार्ड कसे तयार करावे..

तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे