आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

छत्रपती शिवरायांचे प्रतिरूप साकारणाऱ्या धैर्यश रायसाकडा याला शाळेकडून गोल्ड मेडल

पाचोरा (प्रतिनिधी) लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा अर्थच असा आहे की बालकाच्या अंगभूत असलेले सूक्त गुण तो लहानपणापासूनच कळत नकळत प्रदर्शित करत जातो आणि असे कलागुण ओळखून त्यांचा योग्य दिशेने विकास केला तर प्रत्येक बालक भविष्यामध्ये निश्चितच यशस्वी होतो.  पत्रकार  दैनिक नजरकैदचे विभागीय संपादक, राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांचे चिरंजीव धैरेश (रुद्र) रायसाकडा हे पाचोरा येथील गिरनाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये सीनियर केजी या इयत्तेत शिक्षण घेत आहेत.

अवघ्या पाच वर्षाच्या वयात धैर्येशने आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रकटीकरण केलेले आहे यंदाच्या पाचोरा येथील भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्याने साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिरूप अत्यंत देखणे व रुबाबदार ठरले. विद्यालयातील सर्व वेशभूषांमधून अत्यंत हुबेहूब व साजेशे प्रति रूप साकारणाऱ्या धैर्यश रायसाकडा याला गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन शिंदे इंटरनॅशनल स्कूल ने गौरव केला तसेच एसबीआय लाइफ यांचे तर्फे घेण्यात आलेल्या विविध रंग स्पर्धेत सुद्धा त्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशस्तीपत्रकाची थाप पाठीवर मिळवली अवघ्या पाच वर्षात त्याने सुरू केलेली ही वाटचाल निश्चितच एका मोठ्या ध्येयाकडे जात असल्याचे संकेत पालकांना मिळाले आहेत त्याच्या या यशाबद्दल मनस्वी अभिनंदन व त्याच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विद्यालयाने त्याला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विद्यालयाचे सुद्धा मनस्वी आभार त्याच्या या अल्पशा परंतु प्रेरणादायी यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, भाजप नेते अमोल  शिंदे. संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील विद्यालयातील कला व क्रीडा शिक्षकांचे योगदान लाभले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे