भोसरी डेपोमध्ये संविधान वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला संपन्न
भोसरी (झूम मराठी) पी’एम’पी’एम’एलच्या भोसरी डेपोमध्ये भारतीय संविधानाचा ७२ वा वर्धापन कार्यक्रम विजयकुमार मदगे भोसरी डेपो मॅनेजर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून सेवानिवृत्त लेबर ऑफिसर सी.एस. अहिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना प्रमुख पाहुणे सी.एस.अहिरे साहेब व डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे साहेब यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भिमराव गेडाम कार्याध्यक्ष, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी उपस्थितांना भारतीय संविधान दिनाचे महत्त्व समजावून सांगितले व मा.डेपो मॅनेजर यांचे सूचनेप्रमाणे संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रमाणे भोसरी डेपोतील कामगारांचे उपस्थितीमध्ये ७२ व्या संविधान वर्धापन दिनाचा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे तयारीसाठी विजय लांघी, दीपक सुर्यवंशी, भरत काळजे, सुरेश गवई, संगिता फ्रान्सिस मॅडम व श्रीमती लक्ष्मी कलापुरे ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.



