नांदगाव – जातेगाव श्रीपिनाकेश्वर महादेव मंदिर देवस्थानात जपानुष्ठान
नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर देवस्थान येथे निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी जी महाराज यांच्या उपस्थितीत वार्षिक गुढीपाडव्याच्या महोत्सवाच्या निमित्ताने जपानुष्टानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जातेगाव येथे साठच्या दशकात निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजज्ञ(बाबाजी) यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पिनाकेश्वर मंदिर जिर्णोध्दाराला प्रारंभ केला. श्री जनार्दन स्वामींनी दिव्य भव्य अलौकिक सानिध्यात लाखो भाविक या अनुष्ठान, यज्ञ विधी, साधनेसह श्रमदान कार्य सहभागी झाले होते. या जपानूष्ठानाची दिव्य परंपरा जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने अखंडपणे सुरू आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी ध्वजारोहणानी या माणसाला सुरुवात होणार असून जपानुष्टान, अखंड नंदादीप, व यज्ञासह दररोज विधी, सत्संग, आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दिनांक 29 मार्च 2023 रोजी बुधवारी या महत्वाची सांगता होणार आहे.
पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या डोंगरावर या महोत्सवासाठी अनुष्ठान मंडप व यज्ञ मंडपाच्या उभारणीसह जयत तयारी सुरू करण्यात आली असून भाविकांनी या धार्मिक महोत्सवात सहभागी होण्याची आव्हान जय बाबाजी भक्त परिवार तसेच विश्वस्त समिती तर्फे करण्यात येत आहे.


