आपल खान्देशगुन्हेगारी

अंमळनेर – सार्वजनिक बांधकाम (बांधकाम) उपविभाग अधिकारी अखेर ACBच्या जाळ्यात!!

Zoom Marathi News Web Media
 By Dilip Pardeshi

अमळनेर : सार्वजनिक बांधकाम (बांधकाम) उपविभाग अमळनेर येथे कर्तव्यावर असणाऱ्या दिनेश पाटील व सत्यजित गांधलीकर हे आज शेवटी ACBच्या जाळ्यात अडकले. मात्र दिनेश पाटलाने सत्यजित गांधलीकरचा बळी घेतला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

लाच लुचपत प्रतिबंध विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहिती नुसार २ लाख ५८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने दिनेश पाटील व सत्यजित गांधलीकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत तकारदार पुरुष हा धुळे येथील रहिवाशी असुन तो धुळे येथे एका कंस्ट्रक्शन कंपनीत साईट इंजिनियर असुन सदर कंस्ट्रक्शन कंपनीची कामे व कंपनीचा आर्थिक व्यवहार पाहतो. नंदुरबार येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांचे कडुन आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचा ठेका घेतला असुन सदरचे काम तकारदार नोकरीस असलेल्या धुळे येथील बांधकाम कंपनीने करारनामा करुन घेतले आहे. सदर आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या आतापावेतो झालेल्या बांधकामाचे बिल कंस्ट्रक्शन कंपनीस अदा केल्याच्या मोबदल्यात दिनेश पाटील, उपविभागीय अभियंता (वर्ग १) अमळनेर यांनी तकारदार यांच्या कडे बिलाच्या २ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभाग, धुळे यांच्या कडे दिली होती. तकारदाराच्या तक्रारीची दि ०८ जून २०२१ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता दिनेश पाटील, उपविभागीय अभियंता (वर्ग १) यांनी स्वत:साठी व त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता गांधीलकर यांच्यासाठी असे एकुण २.५८,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधीलकर यांनी दिनेश पाटील , उपविभागीय अभियंता यांना तकारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणून त्यांचे विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयाचे कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सुरु होती. संबंधित आरोपींना ताब्यात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे