महाराष्ट्रराजकीय

“…किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा..

मुंबई | “आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजल खान आले, तरी मला त्याची पर्वा नाही”, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे ग्रुपला दिला आहे. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात आज (27 सप्टेंबर) राज्यातील सत्तांतर, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची या पाच मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आलेल्या उस्मानाबादच्या कार्यकर्त्यांची संवाद साधताना वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आत्ताच जे वातावरण आहे भारावून टाकणारा वातावरण आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजल खान आले तरी मला त्याची परवा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत एक चांगली सुरुवात झाली आहे. दुसरी केस सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. माझा आई भवानी वर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे कारण कैलास ने काय केलं हे सर्वांना माहिती आहे.”

कैलास ने काय पराक्रम केले ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. ओम राजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील बघितलंय. आणि हे तुमचे प्रतिनिधी आहेत. जिथे प्रतिनिधी घट्ट आहे. तेथे शिवसैनिक हे घट्ट राहणारच. मात्र, तुम्ही आज येथे येण्याआधी लोक आले होते. आता जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ज्यांना तुम्ही खसता खाऊन मोठे केले ते खोक्यात गेले. मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाहीये. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो. तेव्हापासून आजपर्यंत असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक मोजले असते तर एक मेळावा इथेच झाला असता. आणि बाकीच्यांचे फोन येत आहेत. निरोप येत आहेत. कुठेही काही आपले वाकडे झालेले नाही. भवानी मातेची कृपा आहे. ती कृपा ही नुसती कृपा नाही तर तिने दाखवून दिलेय की, खरे कोण आणि खोटे कोण अशी अनेक आसमानी संकटे आली आहेत. जस त्या वेळेला आपण  शिवाजी महाराजांना भवानी मातेने तशी तलवार दिली अशी श्रद्धा आहे. तसेच तुमच्याकडे बघून मला असे वाटतेय की भवानी मातेने मला ही तलवार दिली आहे.”

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे