आपल खान्देशराजकीय

नगरदेवळ्यात भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर

पाचोरा(झूम मराठी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा तालुक्यात या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज नगरदेवळा येथे भारतीय जनता पार्टी व पुणे अंदजन मंडळ संचलित कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी नगरदेवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आखतवाडे रोड,नगरदेवळा येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आले होते.हे शिबिर यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेषदादा पाटील भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या नेत्र तपासणी शिबिरामध्ये जवळपास ३५० गरजू रुग्णांनी डोळ्यांची तपासणी केली असून यामधून १४० रुग्णांची लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

  या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी नगरदेवळा शहर व नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गट मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यामुळे नगरदेवळा शहरासह परिसरातील गरजू नागरिकांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,सेवा पंधरवाडा समितीचे तालुका संयोजक सुनील पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ तालुका उपाध्यक्ष महेश पाटील नगरदेवळा येथील सरपंच प्रतीक्षा काटकर नामदेव पाटील भरत पाटील वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र पाटील किरण काटकर राजेंद्र पवार राजेंद्र महाजन सुनील राऊळ बापू चौधरी मनोज पाटील किशोर पाटील शंकर राऊळ सागर पाटील व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे