आपल खान्देश
पाचोराशहरातील ‘प्रफुलउत्सव’ दांडिया व गरबा रास महोत्सव तयारीत खा उन्मेष पाटील यांनी दिली भेट
पाचोरा(प्रतिनिधी) माई मंडळ व शिंदे अकॅदमी आयोजित प्रफुल उत्सव २०२२ निमित्त दांडिया व गरबारास महोत्सवाची जोरदार तयारी सुरू असतांना जळगाव खासदार उन्मेष पाटील व अमोल शिंदें यांनी भेट दिली. यावेळी माई मंडळ व शिंदे अकॅदमीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील कैलामाता मदिरा जवळ नवरात्री निमित्ताने प्रफुल उत्सव २०२२ निमित्त दांडिया व गरबा रास महोत्सवाची कंबर कसून तयारी करीत असताना खासदार उन्मेष पाटील व अमोल शिंदें यांनी भेट देऊन तयारी कश्या प्रकारे सुरु आहॆ त्याची पाहणी करून घेतली. कान मंत्र देऊन हा कार्यक्रम यशस्वी होईल याची परीक्षण करून खात्री केली हा कार्यक्रम सर्वसाधारण लोकांसाठी असून कुठलीही इंट्री फी नसणार असून याचा पुरेपूर आनंद घ्यावा असे सांगितले.



