बकालेच्या अटकेसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वसमावेशक मोर्चा निघणारच..
अशोक शिंदे यांची पाचोरा येथे पत्रकार परिषदेत माहिती...
पाचोरा (प्रतिनिधी) एल. सी. बी. चे किरण बकाले यांनी मराठा समाजा विषयी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल बकाले यास तातडीने अटक करुन कठोरात कठोर शासन करावे. जेणेकरून मराठा समाजावर कोणी अशा घाणेरड्या भाषेत वक्तव्य करणार नाही. बकाले यास तातडीने अटक करुन तुरुंगात पाठवा या रास्त मागणीसाठी दि. ३० सप्टेंबर रोजी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली. पत्रकार परिषदेस व्ही. पी. पाटील (जामनेर), रेड स्वस्तिकचे पी. आर. ओ. रोशन मराठे, सेल टॅक्स विभागाचे मा. डायरेक्टर जनरल जे. बी. पाटील (पारोळा), छत्रपती शिवाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष किरण बोरसे, प्रविण जाधव, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, जयदेव पाटील, राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील, अनिल मराठे, हिरालाल पाटील, मुन्ना पाटील, पी. एस. पाटील, दिपक मुळे, दिपक पाटील, रामा जठार, अंकुश ठाकरे, आबा देवरे, नितीन पाटील, सुनिल पाटील, संतोष पाटील, प्रमोद भुसारे, रवि देवरे सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
अशोक शिंदे हे पुढे बोलतांना म्हणाले की, किरण बकाले यांचे कृत्य हे अतिशय गंभीर असून देखील त्यांना वाचविण्याचे होत असलेले प्रयत्न, समाजातील बहुतांश लोकप्रतिनिधींचे मौन आणि काही संघटना दबावामुळे मागे हटल्या असल्या तरी मराठा समाजाच्या व आपल्या माता भगिनींच्या रक्षणार्थ जळगावात दि. ३० सप्टेंबर रोजी सर्वसमावेशक मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चात अन्य समाज संघटनांचाही पाठींबा मिळाला असुन मोर्चात ५० हजार सर्वसमावेशक युवा, पुरुष व महिला सहभागी होणार असल्याचे ही अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी रोशन मराठे व बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनीही मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेता मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.



